Thu, Feb 21, 2019 15:09होमपेज › Pune › सेव्हन लव्ह्ज ते मार्केटयार्ड उड्डाणपुलास मंजुरी

सेव्हन लव्ह्ज ते मार्केटयार्ड उड्डाणपुलास मंजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  : प्रतिनिधी 

पुणे-सोलापूर रस्त्यावरून आणि पुणे रेल्वे स्टेशनकडून कोंढवा, गंगाधाम, बिबवेवाडी या परिसराकडे ये-जा करणार्‍या वाहनांसाठी सेव्हन लव्ह्ज चौक ते मार्केटयार्ड (वखार महामंडळपर्यंत) दरम्यान उड्डाणपूल साकारला जाणार आहे. या उड्डाणपुलास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.   स्वारगेट, पुणे स्टेशन आणि हडपसरकडून सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड, सातारा रस्ता, धनकवडी तसेच पुढे गंगाधाम चौकातून बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगरकडे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे.

मार्केटकडे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण झाले असले, तरी डायसप्लॉट येथे रस्त्याची रुंदी कमी आहे. मार्केटयार्डकडे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने प्रामुख्याने सकाळच्या वेळी या ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून सेव्हन लव्ह्ज चौक ते मार्केटयार्ड (वखार महामंडळ) गोडाऊनपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डणपुलावरून दुहेरी वाहतूक असणार आहे.  या कामासाठी 41 कोटी रुपये खर्च येणार असून, उड्डाणपुलाचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 
 

 

 

tags ; pune,news, Seven Love to Marketyard Flyover Approval


  •