होमपेज › Pune › संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी नाकारली

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी नाकारली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  ; प्रतिनिधी 

श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी काढल्या जाणार्‍या मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, या कारणाने पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. प्रमुख कार्यकर्ते शनिवारवाडा प्रांगणात जमणार असून, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत. कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर

अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एकबोटे यांना अटक झाली. भिडे यांना अटक करण्यात यावी, यासाठी सोमवारी मुंबईत  मोर्चा निघाला होता. भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून 
मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर बुधवारी कार्यकर्ते शनिवारवाड्याच्या प्रांगणात जमणार आहेत. त्यानंतर संयोजक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत.
 

 

 

tags ; pune,news,Sambhaji, Bhide, support, strike, permission,


  •