Mon, Sep 24, 2018 17:10होमपेज › Pune › कर्मचार्‍यांनो मोबाईल बंद नको

कर्मचार्‍यांनो मोबाईल बंद नको

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

एसटी कर्मचारी यापुढे त्यांचा फोन स्वीच ऑफ ठेवू शकणार नहीत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याबाबत आदेश काढला असून, एसटीच्या सर्व विभागांतील विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक व विभागातील अन्य अधिकार्‍यांनी त्यांचे मोबाईल कायम सुरू ठेवावेत, असे परिपत्रकच काढण्यात आले आहे.  बर्‍याचदा अधिकारी त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे अपघात, आपत्कालीन परिस्थिती व महत्त्वाच्या कामावेळी संबंधितांशी संपर्क साधणे शक्य होत नाही. मोबाईल कायमस्वरूपी सुरू ठेवा, असा आदेश यापूर्वीदेखील काढण्यात आला होता; मात्र त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. आदेशाचे पालन होताना दिसत नाही असे दिसल्यास आता मात्र संबंधित अधिकार्‍यांना त्या त्या महिन्याचा संपर्क भत्ता देण्यात येणार नाही, असे या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.