Sat, Apr 20, 2019 18:29होमपेज › Pune › नदी प्रदुषणात ‘वैकुंठ’ चाही हात

नदी प्रदुषणात ‘वैकुंठ’ चाही हात

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:46AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील विविध ठिकाणांहून अंत्यविधीसाठी येणार्‍या वैकुंठ स्मशानभुमीमधील शिल्‍लक राहिलेली राख ही नदीपात्रातच सोडले जात असल्याचे समोर आले असून नदी प्रदुषणात वैकुंठ स्मशासनभुमीचाही मोठा हात आहे. भावनिक होऊन नागरिकांकडूनच मोठ्या प्रमाणात ही राख नदीत टाकून दिली जात असल्याचा दावा मनपाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, नदीच्या प्रदुषणात मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून महापालिका प्रशासनाने यावर ठोस भुमिका घेणे गरजेचे आहे.

नवी पेठ येथे असलेल्या वैकुंठ स्मशासनभुमीमध्ये विविध पेठा तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी येत असतात. वैकुंठ येथे विद्युत दाहिनी बरोबरच लाकडावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामध्येही विद्युतदाहिनीमध्ये होणार्‍या अंत्यसंस्कारामध्ये शिल्‍लक राहणारी राख ही तेथील एक कंटनेरमध्ये टाकली जात परंतू लाकडावर होणार्‍या अंत्यसंस्कारातील राख ही मात्र नदीमध्ये फेकून दिली जाते. अधिकार्‍यांकडून एक कंटनेर आणि 5 ते 6 गाड्या राख टाकण्यासाठी ठेवण्यात आली असली तरी नागरिकांकडून त्यामध्ये राख टाकली जात नसल्याची तक्रार मनपा अधिकार्‍यांनी केली आहे. पंरतू, दुसर्‍या बाजुला वैकुंठ स्मशासनभुमीच्या मागील बाजुस भिंतीला भगदाड पाडून नदीपात्रात प्रवेश करण्यासाठी रस्ता तयार करुन ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे महापालिकेच कर्मचारीच राख नदीपात्रात फेकून देण्यासाठी मदत करित असल्याची चर्चाही केली जात आहे.

दिवसेंदिवस वाढत्या नदी प्रदुषणावर कोटी रुपये खर्च होत असताना महापालिका प्रशासन मात्र वैकुंठ येथील प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागानेही याबाबत आपल्या हद्दीमध्ये नसल्याचे सांगून हात झटकलेले आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा बसणार का नाही, याबाबत शाशंका निर्माण झालेली आहे. नागरिकांनी आणि महापालिका प्रशासनानेही अशा प्रकारची राख नदीपात्रात न टाकता कंटनेरमध्ये ठेवून त्याची नंतर विल्हेवाट लावल्यास नदीचे प्रदुषण रोखू शकतो. 

राखेबाबत वैकुंठमध्ये एक कंटनेर आणि पाच ते सहा गाड्या ठेवल्या आहेत. विद्युतदाहिनीतील जमा होणारी राख ही कंटनेरमध्येच टाकली जाते परंतू इतर शेडमध्ये जमा होणारी राख मात्र मृतांच्या नातेवाईकांकडूनच नदीपात्रात सोडली जाते. कंटनेर अथवा या गाड्यांमध्ये राख ठेवण्याची विनंती केली जाते परंतू भावनिकतेमुळे ते शक्य होत नाही. 
 

   बाळासाहेब टिळेकर, आरोग्य निरीक्षक,  वैकुंठ स्मशानभुमी