Fri, Sep 21, 2018 21:15होमपेज › Pune › रेल्वे सेवा सुरळीत

रेल्वे सेवा सुरळीत

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:27AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात येणार्‍या व पुण्यातून बाहेरगावी जाणार्‍या रेल्वेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसून, मंगळवारी सर्व रेल्वे वेळापत्रकानुसारच धावल्या. पुण्याहून लोणावळ्याला सायंकाळी 4.45 वाजता सुटणारी लोकल तांत्रिक कारणामुळे 5 वाजता सुटली; मात्र त्यापाठोपाठ सुटणारी इंटरसिटी एक्स्प्रेस व अन्य लोकल पुण्यातून वेळापत्रकानुसारच सुटल्या. कोणतीही रेल्वे रद्द करण्यात आलेली नाही, अशी  माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. त्याचबरोबर प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व विनाकारण चुकीच्या बातम्या पसरवू नये, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.