Thu, Sep 20, 2018 17:58होमपेज › Pune › प्लास्टिक बाटल्यांचा आता पुनर्वापर शहरात राबविणार प्रकल्प 

प्लास्टिक बाटल्यांचा आता पुनर्वापर शहरात राबविणार प्रकल्प 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरात गोळा होणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्यांचा आता पुनर्वापर होणार आहे. एका स्वयंसेवी संस्थेमार्फत शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यासंबंधीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे; त्यामुळे शहरातील प्लास्टिकची समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.  शहरात दररोज सोळाशे ते सतराशे टन कचरा संकलित होतो. या कचर्‍यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण जास्त आहे. दैनंदिन दहा टनांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्या वापरून फेकल्या जातात. या बाटल्यांमुळे प्लास्टिकच्या समस्येत भर पडत आहे. त्याचबरोबर अशा बाटल्यांमध्ये नियमित पाणी भरून पॅकिंग करून त्या विकल्या जातात, त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न उभा राहतो.

त्यावर उपाययोजना म्हणून ‘आर्ट्स अलाईव्ह फाऊंडेशन’ या संस्थेने प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराचा प्रकल्प हाती घेतला आहे. सद्यःस्थितीला कोरेगाव पार्क आणि औंध या ठिकाणी दररोज 10 हजार बाटल्यांवर प्रक्रिया केली जात आहे. आता संपूर्ण शहरात 50 ठिकाणी बाटल्या गोळा करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, विमानतळ, शैक्षणिक संस्था तसेच धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी संकलित होणार्‍या बाटल्या गोळा करून, त्याचे क्रशिंग करून पुनर्वापर केला जाणार आहे.
 


  •