होमपेज › Pune › पावणे तीन लाख शिधापत्रिका आधारशी लिंक

पावणे तीन लाख शिधापत्रिका आधारशी लिंक

Published On: Jan 06 2018 1:47AM | Last Updated: Jan 06 2018 1:47AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुरवठा विभागाची विधानसभानिहाय 11 कार्यालये असून, त्यात 923 रेशन दुकाने आहेत. शिधापत्रिकाधारक लाभार्थी कार्ड संख्या 3 लाख 77 हजार 961 एवढी आहे. यापैकी दोन लाख 79 हजार 160 शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून गैरव्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शिधापत्रिका; तसेच रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातून अपात्र लाभार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या जात असून, गरजवंतांनाच शिधा मिळावा, हा यामागील शासनाचा उद्देश आहे. 

तथापि, सन 2015 पासून शिधापत्रिकांना आधार क्रमांकाशी जोडण्यात येत आहे. गत दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण व्हायला हवी होती. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 11 विधानसभानिहाय कार्यालयामध्ये हे काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरात अंत्योदय योजनेचे 10 हजार 867 कार्डधारक असून, त्यातील 7 हजार 894 कार्ड आधारला लिंक करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेले 3 लाख 67 हजार 94 शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी 2 लाख 71 हजार 266 कार्ड आधारला जोडण्यात आले. 
लाभार्थ्यांची संख्या पाहिल्यास अंत्योदय योजनेतील 46 हजार 667 पैकी 25 हजार 871 लाभार्थ्यांची आधार लिंक झाली आहे. तर अन्न सुरक्षा योजनेतील 13 लाख 97 हजार 178 लाभार्थ्यांपैकी 8 लाख 43 हजार 40 जणांची आधार लिंक करण्यात आली आहे.