Mon, Mar 25, 2019 13:35होमपेज › Pune › रामदास आठवले यांची कोरेगाव भीमा ला भेट

रामदास आठवले यांची कोरेगाव भीमा ला भेट

Published On: May 11 2018 4:09PM | Last Updated: May 11 2018 4:09PMकोरेगाव भीमा :- वार्ताहर

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा दंगलीतील ग्रस्त सुरेश सकट कुटुंबियांची वाडा पुनर्वसन येथे जाऊन  भेट घेतली.

सकट कुटुंबियांचे पुनर्वसन करणार तसेच या  प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्‍याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. यावेळी आठवले यांनी पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांच्याशी  फोन वरून चर्चा केली तसेच सकट कुटुंबियांचे संरक्षण व आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना त्‍यांनी केल्‍या आहेत. तसेच आठवलेंनी कोरेगाव भीमाच्या समाज मंदिराला देखील धावती भेट देऊन आढावा घेतला तसेच विविध अडचणी समजून घेऊन पोलीस यंत्रणेला  सूचना केल्या