Wed, Nov 21, 2018 11:22होमपेज › Pune › आरटीई’चा टक्का वाढला

आरटीई’चा टक्का वाढला

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेशाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी येत्या बुधवार दि.7 मार्चपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश नोंदणीचा टक्का वाढला असून अर्जांची संख्या तब्बल दोन लाखापर्यंत जाण्याची शक्यता प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदादेखील राबविण्यात येत आहे.

त्यासाठी 10 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होऊन 28 फेब्रुवारीपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली होती.परंतु दिलेल्या मुदतीत अपेक्षित अर्ज न आल्यामुळे अर्ज भरण्यास 7 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात 8 हजार 980 शाळांमध्ये प्रवेशाच्या 1 लाख 26 हजार 128 जागा उपलब्ध असून, रविवार दि.4 मार्चपर्यंत 1 लाख 69 हजार 846 अर्ज भरून पूर्ण झालेले दिसून येत आहेत. येत्या 7 मार्चपर्यंत विद्यार्थी तसेच पालकांना अर्ज भरता येणार आहेत.