Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Pune › ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किर्ती शिलेदार

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किर्ती शिलेदार

Published On: Apr 19 2018 10:06PM | Last Updated: Apr 19 2018 10:06PMपुणे :प्रतिनिधी 

मुंबई येथे होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किर्ती शिलेदार यांची निवड झाली आहे. आईला मिळालेल्या पदाचा मान मला मिळाला याचा आनंद वाटतोच,पण हा सुध्दा एक योगायोग आहे. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रीया शिलेदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्‍या. 

संमेलनाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत सुरेश साखवळकर, श्रीनिवास भगणे आणि किर्ती शिलेदार यांचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे आले होते. त्यातून एकमताने किर्ती शिलेदारांची निवड करण्यात आली. १३ ते १५ जून दरम्यान मुंबई येथे हे नाट्य संमेलन होणार आहे.

किर्ती शिलेदार म्हणाल्या,‘‘संगीत नाटक ही महाराष्ट्राची अलौकिक  परंपरा आहे. संगीत नाट्य रंगभूमी बालगंधर्वानी गाजवली. तोच वारसा  पुढे माझ्या  आई बाबांनी (जयमाला आणि जयराम शिलेदार) चालू ठेवला.आई बाबांचाच वारसा आम्ही सुध्दा गाजवला आहे. मध्ंयतरीच्या काळात संगीत नाटकामध्ये काम करण्याचे थांबविले होते. मात्र जेष्ठ नाटकाकार रत्नाकर मतकरी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे संगीत नाटक  बैठकीच्या नाटकात रूपांतर केले. त्यामुळे पुन्हा नाटक करण्यासाठी पुन्हा सिध्द झालो. पाच नाटकांचे नाटक आम्ही दोन तासांवर आणले आहे. त्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. संगीतन नाटक पुन्हा सुरू झाले पाहिजे. त्यातही बैठकीचे नाटक  सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. 

 सध्या संगीत नाटकामध्ये वेगळे प्रयोग होत आहेत. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. मात्र ही परंपरा दृढ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच तरूण पिढीने संगीत नाटकाकडे वळले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

‘आईला मिळालेले पद मिळाल्याचा आनंद वाटतो’

आईला मिळालेल्या पदाचा मान मला मिळाला याचा आनंद वाटतोच, पण हा सुध्दा एक योगायोग आहे. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना 98व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कीर्ती शिलेदार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

कीर्ती शिलेदार म्हणाल्या, संगीत नाट्य रंगभूमी बालगंधर्वांनी गाजवली. तोच वारसा माझ्या आई-बाबांनी (जयमाला आणि जयराम शिलेदार) सुरू ठेवला. तो आम्ही पुढे चालवला आहे. ज्येष्ठ नाटकाकार रत्नाकर मतकरी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे संगीत नाटकाचे बैठकीच्या नाटकात रूपांतर केले. पाच तासांचे नाटक आम्ही दोन तासांवर आणले आहे. त्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. संगीत नाटक पुन्हा सुरू झाले पाहिजे.