Fri, Mar 22, 2019 08:24होमपेज › Pune › पोलिसांना पुन्हा सुरू होईल आठ तास ‘ड्युटी  

पोलिसांना पुन्हा सुरू होईल आठ तास ‘ड्युटी

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AMपिंपरी : प्रतिनिधी

पोलिसांचा ताण कमी व्हावा आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी मुबंई पोलिसांनी नुकताच आठ तास ड्युटी हा प्रयोग सुरु केला आहे. सात वर्षापूर्वी सर्वप्रथम पुणे पोलिसांतर्गत येणार्‍या भोसरी पोलिस ठाण्यात हा प्रयोग यशस्वीरित्या राबविण्यात आला होता.  मात्र नेहमी प्रमाणे अधिकारी बदलले, की योजना गुंडाळल्या असा प्रत्यय आला. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील पुन्हा आठ तास ड्युटी सुरू होणार का? असा प्रश्न पडला आहे.

कमी मनुष्यबळात हद्दीत शांतता ठेण्यासाठी पोलिसांना अहोरात्र काम करावे लागते. याचा विचार करून 2011 साली तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आठ तास महाराष्ट्र पोलिसासाठी प्रयोग राबविण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यावेळच्या इतर अधिकरार्यांनी झोन तिनमधील भोसरीचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत यांनी तत्काळ हा प्रयोग राबविण्याचे नियोजन केले. प्रत्येक कर्मचारी-अधिकार्‍यांना त्यांच्या वाढदिवसादिवशी सुट्टी देण्याची संकल्पना पुढे आली. आठ तास ड्युटीमुळे पोलिस कर्मचार्‍यांवर येणारा शारिरीक आणि मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याचा चांगला परिणाम हा पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना तसेच पर्यायाने नागरिकांना देखील दिसून येत होता. मुंबई पोलिसांना नुकतीच आठ तास ड्युटी देण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. परंतु, देशात सर्वप्रथम पुणे पोलिसांतर्गत असलेल्या भोसरी पोलिस ठाण्यात राबविण्यात  आला होता. तो पुन्हा सुरू होणार का याकडे सर्व पोलिस कर्मचर्‍याचे लक्ष लागले आहे.

भोसरी पोलिसांचे सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या तीन शिफ्टमध्ये हे कामकाज चालत होते. यासाठी बायमॅट्रीक सिस्टीम बसविण्यात आली होती. महिला पोलिस कर्मचार्‍यांना रात्री 11 ते सकाळी 7 या वेळात ड्युटी देण्यात येत नव्हती. तसेच पोलिस ठाण्यातील ऑफिस स्टाफ (क्लेरिकल) काम करणार्‍यांना देखील सकाळी दहा ते सहा या वेळात शिफ्ट देण्यात आली. पोलिसांच्या वायरलेस, गार्ड, फिक्स पॉईंट, लॉकअप गार्ड, लोकल इंटेलिजन्स, तपास पथक या सर्वांना देखील आठ तास ड्युटी उपक्रमात सामावून घेण्यात आले होते. दिल्लीच्या माजी महासंचालकांनी पुणे शहर पोलिसांच्या आठ तास ड्युटी या अभिनव उपक्रमाची पाहणी केली होती.