Sat, Mar 23, 2019 16:18होमपेज › Pune › हमीभाव न दिल्यास दंड, शिक्षा नाही

हमीभाव न दिल्यास दंड, शिक्षा नाही

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 मध्ये हमी दरापेक्षा कमी दराने व्यापार्‍यांनी शेतमाल खरेदी केल्यास दंडाची वा शिक्षेची तरतूद नाही. तसेच याबाबत शासनाने कोणताही अध्यादेश अद्यापपर्यंत निर्गमित केलेला नसल्याचा निर्वाळा पणन संचालनालयाने दिलेला आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठा पूर्ववत सुरू न झाल्यास शेतकरी संघटना आणि बाजार समित्या आमने-सामने उभ्या राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारच्या या आदेशामुळे व्यापार्‍यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे, अशी भावना शेतकरी संघटनांमधून व्यक्‍त होत आहे. 
सरकारने या प्रश्‍नावर स्पष्टपणे घूमजाव केले आहे. 

राज्यात गेल्या सहा दिवसांपेक्षा अधिक दिवस व्यापार्‍यांनी खरेदी थांबविल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून, त्यामुळे ओरड सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (दि.3) आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना पत्राद्वारे शनिवारी (दि.1) आदेश दिलेले असून बाजारपेठा सुरळित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

बंद पाळणार्‍या घटकांसोबत चर्चा करुन व्यवहार सुरळित ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावी. तसेच बाजार समितीच्या कायद्यातील अधिनियम, नियमातील तरतुदी अन्यचेही आवश्यक वाटल्यास उपाययोजना करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.