Wed, Apr 24, 2019 16:17होमपेज › Pune › ‘पीएमआरडीए’च्या अडीच हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

‘पीएमआरडीए’च्या अडीच हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) हिंजवडी मेट्रो, रिंगरोड, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन अदी विकस कामे प्रस्तावित असून, त्यासाठी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 2591 कोटी 77 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री तथा पीएमआडीचे अध्यक्ष देवेंद्र फडवणीस यांनी सोमवारी मंजुरी दिली आहे. पीएमआरडीएची वार्षिक चौथी बैठक देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई विधानभवनात झाली. यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी रुपये 888 कोटी, रिंगरोडसाठी रुपये 1235 कोटी, म्हाळूंगे टीपी स्किमसाठी 152 कोटी, रस्ते व पूल बांधणीसाठी 99 कोटी, वाघोली पाणीपुरवठ्यास 25 कोटी, अग्निशमन केंद्रासाठी 50 कोटी, अशी तरतूद करण्यात आली आहे. 

बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हापरिषदचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग सचिव नितीन करीर, विभागीय

आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर अदींचा उपस्थिती होती. म्हाळुंगे टीपी स्किमसाठी 619 कोटीचे कर्ज  नगररचना योजनेच्या धर्तीवर विकसित होत असलेल्या म्हाळुंगे टापी स्किमसाठी पीएमआरडीएने हुडको या वित्तीय संस्थेकडून 619 कोटी कर्ज घेतले आहे. या कर्जातून  पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. 
 

 

tags ; pune ,news,PMRDA, approves, 2.5 billion,crores, budget,


  •