Wed, Jul 24, 2019 12:16होमपेज › Pune › पुणे : पॅन्ट फाटल्याने पीएमपीएमएल विरोधात तक्रार

पुणे : पॅन्ट फाटल्याने पीएमपीएमएल विरोधात तक्रार

Published On: Jan 17 2018 5:04PM | Last Updated: Jan 17 2018 5:14PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करत असताना एका प्रवाशाला वाईट अनुभव आला. बसमधील बाहेर आलेल्या लोखंडी पट्टीत पँट अडकल्याने त्याची पँट फाटली. याप्रकारामुळे प्रचंड संतापलेल्या प्रवाशाने याविषयी थेट पोलिसात तक्रार नोंदवली.

संजय शितोळे असे त्या व्यक्तिचे नाव असून तक्रारीत शितोळे यांनी नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजीनगरहून जांभूळवाडीला जाणाऱ्या बसमध्ये बिबवेवाडी थांब्यावर संजय शितोळे बसमध्ये बसले. यावेळी कात्रजला उतरत असताना सीटच्या निघालेल्या लोखंडी पट्टीमुळे त्यांची पँट अडकून फाटली गेली. त्यामुळे शितोळे हे प्रचंड संतापले आणि त्यांनी बस कात्रज पोलीस चौकीला नेली व पीएमपीएमएलच्या प्रशासनाविरोधात तक्रार दिली. 

या अनोख्या तक्रारीमुळे आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला आपल्या बसेस सुस्थितीत ठेवाव्या लागणार आहेत.