Tue, Nov 13, 2018 21:29होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष निवडीचा मुहूर्त पुन्हा चुकला

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष निवडीचा मुहूर्त पुन्हा चुकला

Published On: Apr 29 2018 4:16PM | Last Updated: Apr 29 2018 4:16PMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या शहाराध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. रविवारी ( 29 एप्रिलला) राष्ट्रवादीचा शहराध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येणार होते,  प्रत्यक्षात मात्र या नावाची घोषणा होऊ शकली नाही, येत्या आठवड्यात शहराध्याक्षांच्या नावाची घोषणा होईल असे सूत्राकडून सांगण्यात आले.

गत आठवडयात झालेल्या राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकार्‍यांची बैठक झाली, त्यात अजित पवार यांना शहराध्यक्ष निवडीचे अधिकार देण्याचा ठराव करण्यात आला होता, त्यानुसार 29 एप्रिलला नवीन शहराध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते, त्यातच रविवारी पुण्यात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या नावाबरोबरच शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता होती. मात्र, ती फोल ठरली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवडायात नवीन प्रदेशाध्यक्षाकडून या नावाची घोषणा करतील असे सांगण्यात आले.

तरूणांना संधी - पवारांच्या सूचना

ज्यांच्याकडे दहा-दहा वर्षे अध्यक्षपद आहेत, त्यांनी आता पदे सोडावीत असे अजित पवार यांनी खडसावले, यापुढे पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आणि कार्यकारिणीची निवड करताना जास्तीत जास्त तरूण चेहऱ्यांना संधी द्या अशा सूचना पवार यांनी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात दिल्या.