Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Pune › पालिकेच्या ‘कॉल सेंटर’साठी दरमहा होणार 3 लाख खर्च

पालिकेच्या ‘कॉल सेंटर’साठी दरमहा होणार 3 लाख खर्च

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:36AM

बुकमार्क करा
पुणे  :प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने आपले सर्व कामकाज डिजीटल केले आहे. त्यानुसार पालिकेची सर्व कामे संगणकावर केली जातात. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करता यावे, यासाठी मागील वर्षापासून पालिकेने कॉल सेंटर सुरू केले होते. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पीएमसी केअर सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रती महिना तीन लाख रुपये खर्च होणार असून हे काम केयरटेल इन्फोटेक कंपनीला देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. यावर स्थायीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.  

स्थायीसमोर आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील नागरिकांना तक्रारी नोंदविण्याबरोबर पालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यासाठी 18001030222 हा टोल फ्री नंबरही जाहीर करण्यात आला ाहे. दिली जाणार आहे. या कॉल सेंटरसाठी मागील वर्षीही निवीदा काढण्यात आली होती. हे कॉल सेंटर चालविण्यासाठी या वर्षिही निवीदा प्रक्रीया राबविण्यात आली. यासाठी दोन कंपन्यांनी निवीदा सादर केल्या होत्या.

यामध्ये केअरटेल इन्फोटेक लि कंपनीने दिलेली प्रति महिना 2 लाख 75 हजार रुपयाची निवीदा कमी असल्याने त्या कंपनीस काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला आहे.  दरम्यान पीएमसी केअर सेंटर आणि कॉल सेंटरचे काम एकच आहे. केअर सेंटरसाठी पैसा खर्च केला जात आहे. असे असतानाही कॉल सेंटरसाठी प्रतिमहिना एवढा निधी खर्च केला जाणार असल्याने या प्रस्तावावर नाराजी व्यक्ती केली जात आहे.