Mon, Jul 22, 2019 13:10होमपेज › Pune › भिडे,मिलिंद एकबोटेंची नार्कोटेस्ट करा; सर्वधर्मीय नेत्यांनी मागणी 

भिडे,मिलिंद एकबोटेंची नार्कोटेस्ट करा; सर्वधर्मीय नेत्यांनी मागणी 

Published On: Jan 05 2018 7:20PM | Last Updated: Jan 05 2018 7:13PM

बुकमार्क करा
पुणे :  प्रतिनिधी

जातीयवादी शक्तींनी मराठा आणि दलित समाजाला भडकवल्यानेच वढू गावातील दुर्दैवी प्रकार घडला आहे. मात्र यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही समाजाच्या नेत्यांकडून आज पुण्यात सांगण्यात आले. तसेच येत्या काळात मराठा दलित सामाजिक सलोखा परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, मराठा महासंघाचे प्रवीण गायकवाड. आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, दलित नेते राहुल डबाळे आदी नेते उपस्थित होते. 

यावेळी दोन्ही समाजातील नेत्यांनी प्रमुख मागण्या मांडल्‍या यामध्ये जातीय तेढ वाढवणाऱ्या दंगेखोरांवर आणि त्यांचे मास्टर माईंड यांच्यावर  कठोर कारवाई करा, हिंसाचाराचे सूत्रधार असणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे व त्यांच्या समर्थकांना अटक करून त्‍यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी, या घटनेतील नुकसानग्रस्त लोकांना भरपाई देण्यात यावी, या घटनेत मृत राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांस २५ लाखांची मदत मिळावी, जखमी झालेल्‍या नागरिकांना २ ते ५ लाखांची मदत मिळावी या मागण्यांसोबतच २८ डिसेंबरला वढूत झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास २४ तास सुरक्षा देण्यात यावी, तसेच यापुढे अट्रोसिटीसह अन्य कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत याची खबरदारी घेतली जावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्‍या आहेत.