Tue, Sep 25, 2018 16:28होमपेज › Pune › हिंदू जनजागृती समितीचे  एकबोटे अध्यक्ष नाहीत

हिंदू जनजागृती समितीचे  एकबोटे अध्यक्ष नाहीत

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:20AM पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमाप्रकरणी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त (3 फेब्रुवारी) प्रसिद्ध झाले आहे. मुंबईहून आलेल्या या बातमीत एकबोटे यांचा उल्लेख अनवधानाने ‘हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष’ असा झाला. मात्र, एकबोटे हे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असून, हिंदू जनजागृती समितीच्या उल्लेखामुळे समितीची अकारण अपकीर्ती होत असल्याचे प्रतिपादन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

‘या दोन्ही संघटना स्वतंत्र असून, व्यापक हिंदू हिताकरिता अनेक समविचारी उपक्रमांमध्ये एकत्र कार्य करीत असतात. मात्र, या दोन्ही संघटना स्वतंत्रपणे कार्यरत असूनही कोरेगाव भीमा प्रकरणात हिंदू जनजागृती समितीस बदनाम करण्याचा खटाटोप काहीजण करीत असतात’, असा  दावा समितीने केला आहे. समितीत अध्यक्ष किंवा तत्सम कोणतेही पद अस्तित्वात नसल्याचेही समितीचे राज्य प्रवक्ते अरविंद पानसरे यांनी स्पष्ट  केले आहे.