Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Pune › म्हाळुंगे-माण ‘रोल मॉडेल’ ठरेल

म्हाळुंगे-माण ‘रोल मॉडेल’ ठरेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने म्हाळुंगे-माण येथे राज्यात प्रदीर्घ काळानंतर नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येत आहे. ही टीपी स्कीम राज्यासाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्‍वास राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक एन. आर. शेंडे यांनी व्यक्‍त केला आहे. ‘पीएमआरडीए’ने म्हाळुंगे-माण येथे सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर सुनियोजित शहर वसविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्वी टीपी स्कीमच्या माध्यमातून नियोजित शहरांचा विकास केला जात होता. मात्र, 1914 रोजी शहरविकास आराखडा (डीपी) अंमलात आला.

त्यामुळे टीपी स्कीम राबविणे बंद झाले; मात्र, गुजरात सरकारने आपल्या कायद्यात सुधारणा करत अहमदाबाद आणि सुरत शहरामध्ये टीपी स्कीम राबविल्या असून, या दोन्ही शहरांचा विकास हा नियोजनपूर्वक झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 या कायद्यात 2014 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे राज्यात डीपी स्कीम घेणे सुलभ झाले आहे. 

‘पीएमआरडीए’ने म्हाळुंगे-माण टीपी स्कीम तयार करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर ‘पीएमआरडीए’ने टीपी स्कीमचा आराखडा तयार करून तो नगररचना विभागाकडे सादर केला होता. त्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्याचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्यात बर्‍याच वर्षांनंतर टीपी स्कीम होत आहे. म्हाळुंगे येथे प्राधिकरणाची पहिली टीपी स्कीम होत आहे. 

राज्यात नागपूर आणि नवी मुंबईमध्ये टीपी स्कीम राबविल्या जाणार आहेत. मात्र, त्यांचा कोणताच प्रस्ताव अद्यापही नगररचना विभागाकडे सादर झाला नाही. त्यामुळे ‘पीएमआरडीए’नेे सर्व प्रक्रिया तत्काळ करून स्कीम पूर्ण केल्यास ते राज्यासाठी रोल मॉडेल ठरू शकते, असा विश्‍वास शेडे यांनी व्यक्त केला आहे.
 


  •