Wed, Jul 24, 2019 14:09होमपेज › Pune › वनाझ-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या कामास होणार सुरूवात

वनाझ-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या कामास होणार सुरूवात

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:36AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

वनाज ते रामवाडी या क्रमांक दोन मार्गिकेतील  आठ मेट्रो स्टेशनच्या कामांना येत्या आठ दिवसांत सुरुवात होणार आहे. वनाज, आनंदनगर, आयडीअल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन जीमखाना, संभाजी गार्डन आणि पुणे महापालीका या स्टेशनची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी एचसीसी अल्फारा या कंपनीला 500 कोटींची निविदा देण्यात आली आहे.
मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या वनाज येथे दोन तर विजय सेल्सजवळील एका खांबाच्या फाउंडेशनचे काम पुर्ण होईल. त्यामुळे  येत्या आठवड्यात अन्य सात खांबाच्या फाउंडेशनचे काम सुरु होईल. 

या मार्गिकेवरील  वनाज ते शिवाजीनगर येथील खांब उभारणीच्या आणि फाउंडेशनच्या कामांना चांगलीच गती आल्यामुळे त्याच्या पुढील टप्प्याला आत सुरुवात करण्यात येणार आहे.  स्टेशन्सच्या डिझाईन आणि निविदा मंजुर असून आता प्रत्यक्ष त्यांच्या कामाची सुरुवात हे महत्त्वाचे पाऊल आता पडणार आहे. या स्टेशन्सच्या कामासाठी सुमारे 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च एचसीसी अल्फारा कंपनीकडून करण्यात येणार आहे. आठ स्टेशन्सपैकी  सर्वप्रथम आनंदनगर आणि वनाज येथिल स्थानकाच्या कामास सुरुवात होणार आहे, असे वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक दोनचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी  सांगितल आहेे.