होमपेज › Pune › पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीची तयारी अंतिम टप्प्यात

Published On: Mar 22 2018 7:50PM | Last Updated: Mar 22 2018 7:50PM



पुणे : प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या वतीने व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्‍पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ही स्पर्धा दि २३ ते २५ मार्च दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे. 

या स्पर्धेच्या निमिताने महापौर मुक्ताताई टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंद केसरी गणपतराव आंदळकर, रूस्तुम ए हिंद पै. दादू चौगुले, हिंद केसरी दिनानाथ सिंग, ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.   

स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्थानी मल्लादरम्यान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तुर्कस्थानचे ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे सहा आंतरराष्ट्रीय मल्ल यावेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे.

Tags : pune, Mayor trophy, international wrestling, preparation, final stage,