Sun, Nov 18, 2018 01:26होमपेज › Pune › संभाजी ब्रिगेडमध्ये फूट

संभाजी ब्रिगेडमध्ये फूट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे ; प्रतिनिधी

मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली असून प्रवीण गायकवाड या बिगे्रडचे अध्यक्ष झाले आहेत.  राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते. पण, नंतर अंतर्गत वादामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे मनोज आखरे या नव्या अध्यक्षांनी ब्रिगेडची नोंद राजकीय पक्ष म्हणून केली. दरम्यान, राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड पुढे येत असली तरी सामाजिक कामही करीत असून, संभाजी ब्रिगेडच्या नावाचा कोणी गैरवापर करू नये, असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

आता नव्यानेच तयार झालेल्या या ब्रिगेडच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड झालीय; मात्र या फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरू नये, असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. यामुळे आता या दोन्हींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. प्रवीण गायकवाड आणि शांताराम कुंजीर यांनी संभाजी ब्रिगेड नावाच्या बॅनरखाली पत्रकार परिषद घेऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. 

या नव्या कार्यकारिणीमध्ये प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची, तर मुख्य समन्वयक म्हणून शांताराम कुंजीर यांची पुण्यातून निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्‍त प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून रत्नागिरीचे सुधीर भोसले आणि कोल्हापूरचे हिंदुराव हुजरेपाटील यांची, प्रदेश महासचिव म्हणून वाशिमचे सुभाष बोरकर, सचिव म्हणून आत्माराम शिंदे, उपाध्यक्ष म्हणून छगन शेरे, शरद चव्हाण, सुधांशू मोहोड, राहुल बनसोड, अमोल जाधवराव यांची, कोषाध्यक्ष म्हणून अमोल काटे तर प्रदेश संघटक म्हणून सोमेश्‍वर आहेर, दशरथ गव्हाणे आणि सचिन सावंत देसाई यांची नियुक्‍ती करण्यात आली असल्याची माहिती ब्रिगेडचे नवनियुक्‍त मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले.
 

 

tags ; pune,news,Maratha, Seva, Sangh ,Sambhaji ,Brigade, Foot,


  •