Tue, Jul 16, 2019 13:24होमपेज › Pune › मराठा आरक्षण सरकारला हाताळता आले नाही : धनंजय मुंडे

मराठा आरक्षण सरकारला हाताळता आले नाही : धनंजय मुंडे

Published On: Aug 05 2018 3:35PM | Last Updated: Aug 05 2018 3:35PMपुणे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाचे परळी येथे आंदोलन सुरू असताना, आंदोलकांशी सरकारने चर्चा करावी अशी मागणी मी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचा परिणाम म्हणून राज्यभर आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन सरकारला हाताळता आले नाही अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

हे थोरय फेसबुकी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित तिसऱ्या वशोटोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, पुणे महापालिका स्थायी समिती सदस्य लक्ष्मीबाई दुधाने आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, आज देशाची लोकशाही धोक्यात आली असून, न्याय व्यवस्थेचे जे झाले तेच प्रसार माध्यमांचे झाल्याचे दिसून येते. सत्तेत असलेल्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. मराठा आरक्षणाचा लढा पुढे गेला असून, मराठा मित्र-मैत्रिणी यासाठी आपले बलिदान देत आहेत. असे असताना सरकार गप्पा का आहे? असा प्रश्न उपस्थित करून मुंडे यांनी जोरदार टीका केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक मोहसीन शेख यांनी केले तर सुत्रसंचलन उद्धव काळापहाड यांनी केले.