Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Pune › माओवाद्यांशी संबंधावरून अटक केलेल्या चौघांना न्यायालयीन कोठडी 

माओवाद्यांशी संबंधावरून अटक केलेल्या चौघांना न्यायालयीन कोठडी 

Published On: Jun 21 2018 3:36PM | Last Updated: Jun 21 2018 3:35PMपुणे : प्रतिनिधी 

माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत  4 जुलै पर्यंत  करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. पोलीस कोठडीचे हक्क अबाधीत ठेऊन हा आदेश देण्यात आला आहे.    

सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सिताराम राऊत (30, पिंपळरोड, नागपूर मुळ रा. लाखापूर जि. चंद्रपूर) अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत.  तर अ‍ॅड. सुरेंद्र गडलींग याला न्यायालयाने दि. 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

चौघांनाही न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. तसा रिमांड अहवाल गुरुवारी न्यायालयात पोलिसांनी सादर केला. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. शाहिद अख्तर, अ‍ॅड. राहूल देशमुख, अ‍ॅड. सिध्दार्थ पाटील यांनी काम पाहिले.