होमपेज › Pune › टंचाईमुक्त महाराष्ट्राची सुरुवात पुणे विभागातून

टंचाईमुक्त महाराष्ट्राची सुरुवात पुणे विभागातून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणेे विभागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, याचा सकारात्मक परिणाम पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. अद्यापही पाणीपुरवठ्यासाठी एकही टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. मार्च 2017 मध्ये जिल्ह्यात चार, तर पुणे विभागात 47 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये केवळ एका टँकरने सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्राला पुणे विभागापासून सुरुवात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन, पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. 2014-15 मध्ये पडलेला पाऊस वाहून गेल्याने भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झाली होती. टंचाईसदृश 22 जिल्ह्यांतील 19 हजार 59 गावांमध्ये हे जलयुक्त अभियान पहिल्या वर्षी प्राधान्याने राबविण्यात आलेे. या अभियानात सातत्य ठेवल्यामुळे टंचाईमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.  

राज्यात 400 टँकर यंदा राज्यातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, तेरा जिल्ह्यांतील 400 पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात सोळा गावे व एका वाडीला नऊ टँकर, धुळे जिल्ह्यातील दहा गावांत 9 टँकरने, जळगावमधील 71 गावांमध्ये 35 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर पुणे विभागातील सातार्‍यातील एका गावात व वाडीवर केवळ एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, 169 गावांमध्ये 206 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतर जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील अमरावती विभागात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला असून, पाणीटंचाई वाढू लागली आहे. 
 

 

 

pune,news,Maharashtra, started,process,scarcity,free, pune, division,


  •