Tue, Nov 13, 2018 11:03होमपेज › Pune › काळजी करू नका; उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला नाही!

काळजी करू नका; उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला नाही!

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 2:04AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सामाजिक वातावरण बिघडले होते. आता वातावरण निवळत असताना आणि सलोख्याचे वातावरण तयार होत असतानाच काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर 10 जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे मेसेज फिरवले आहेत. त्यात काहीही तथ्य नसून महाराष्ट्र बंद राहणार नाही, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, प्रवीण गायकवाड, तुषार काकडे यांनी दिली.

त्या दुर्दैवी घटनेचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवून नुकसानग्रस्त बांधवांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. दंगलीमधील मृत तरुण राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वनही केले आहे. त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मिळण्याची मागणी केली असून प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. असे असतानाही समाजात गैरसमज पसरवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्याच्या हेतूने हे प्रसिद्धिपत्रक काढल्याचे कुंजीर यांनी म्हटले आहे.