Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Pune › पुणे-लोणावळादरम्यान महिनाभर ब्लॉक

पुणे-लोणावळादरम्यान महिनाभर ब्लॉक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणार्‍या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल-दुरुस्तीकरिता महिनाभर ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. दि. 1 ते 31 डिसेंबरपर्यंत दररोज तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. यामुळे पुणे-लोणावळा व लोणावळा-पुणेदरम्यान धावणार्‍या चार लोकल रद्द केल्या आहेत. लोणावळ्याहून सकाळी 11.30, दुपारी 2 व शिवाजीनगर येथून सकाळी 11.20 व पुण्याहून दुपारी 1 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तळेगावहून शिवाजीनगरकरिता सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी सुटणारी लोकल महिनाभर पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे.