Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Pune › पुण्याच्या वनिता मुळेला ‘केव्हीपीआय’ शिष्यवृत्ती

पुण्याच्या वनिता मुळेला ‘केव्हीपीआय’ शिष्यवृत्ती

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागामधील (आयबीबी) वनिता अभिजित मुळे या विद्यार्थिनीस या वर्षीची प्रतिष्ठेची ‘केव्हीपीआय’ (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) शिष्यवृत्ती मिळाली आहे. आयबीबीमध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेल्या वनिताने ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत 51 वे स्थान मिळविले आहे. 
ही योजना विज्ञान क्षेत्रातील संशोधनास उत्तेजन देण्यासाठी 1999 मध्ये केंद्राच्या सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी)विभागाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. संशोधनामध्ये कारकिर्द घडवू इच्छिणार्‍या प्रतिभावान विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणे व देशातील संशोधन आणि विकासासाठी सर्वोत्तम वैज्ञानिक प्रतिभांची निर्मिती करणे, हे या योजनेचे ध्येय आहे. निवडलेल्या ‘केव्हीपीवाय’ फेलोला पूर्व पीएच.डी. पर्यंत व पाच वर्षांपर्यंत (जे आधी असेल ते) उदार फेलोशिप आणि आकस्मिकता अनुदान दिले जाते. याशिवाय, ‘केव्हीपीवाय’ फेलोसाठी देशातील प्रतिष्ठित संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात.

‘केव्हीपीआय’ फेलोशिप मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. या शिष्यवृत्तीमुळे विज्ञान क्षेत्रातील संशोधन करण्यचा माझा उत्साह वाढला आहे, अशी प्रतिक्रिया वनिताने या व्यक्त केली.