Sun, Oct 20, 2019 02:34होमपेज › Pune › परदेशी गुन्हेगार नागरिकांना बसला लेडी सिंघमचा धसका

परदेशी गुन्हेगार नागरिकांना बसला लेडी सिंघमचा धसका

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 8:23PM

बुकमार्क करा

पुणे  देवेंद्र जैन

पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी सध्या ज्योती प्रीया सींग यांचा चांगलाच धसका घेतला आहे. परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाच्या पोलीस उपायुक्त असलेल्या, लेडी सिंघम ज्योती प्रीया सींग यांची पुणे शहरात मे २०१७ मध्ये पोलीस उपायुक्त म्हणुन बदली झाली. यानंतर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांना परकीय नागरीक नोंदणी कार्यालयाचा पदभार दिला, हाती आलेले काम फत्ते करणे या ध्येयाने त्यांनी या कार्यालयाचा कायापालट केला.

सींग यांनी नुकत्याच कोंढवा येथील शालीमार सोसायटी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये कांगो देशातील दोन व लीबीया येथील एक परदेशी नागरीकांवर त्यांच्या देशात परत पाठवण्याची कारवाई सुरु केली आहे,  तपास करत असताना हे तीन्ही आरोपी त्यांचा अधिवास परवान्याची मुदत संपल्यानंतरही  येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचे आढळुन आले आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेउन संबंधीत देशाच्या दुतावासाला कळवण्यात आल्याचे सींग यांनी सांगीतले. या छाप्यामुळे पुणे शहरात बेकायदेशिरपणे रहात असलेल्या परदेशी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सींग यांनी आतापर्यंत परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात काम केले नसल्यामुळे त्यांनी पुर्ण महीना कार्यालयाच्या कामकाजाचा अभ्यास केला, व नंतर त्यांच्या कामाची पद्धत बघीतल्यानंतर अनेकांनी तोंडात बोटे घातली. या कार्यालयाच्या मागील काही वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की, २०१५ साली एकुन ५०, २०१६ साली ९५, परदेशी नागरीकांना काळ्यासुचीत टाकण्यात आले होते. नोव्हेंबर २०१७ अखेर १३८ नागरिक काळ्यासुचीत गेले आहेत. परदेशी नागरिक काळ्यासुचीत जाण्यामध्ये प्रामुख्याने परवान्याच्या मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणे, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणे, महाविद्यालयात गैरहजर राहणे, अशा अनेक कारणांची पडताळणी केल्या नंतर संबंधीत नागरिकाला काळ्यासुचीत टाकण्यात येते,  आपल्या देशातील न्यायव्यवस्थेचा फायदा घेउन काही नागरिक त्यांचा रहीवास वाढवतात. हे नागरिक नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात, त्यामुळे आता कुठल्याही परकीय नागरिकांने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास, स्थानीक पोलीस ठाण्यातुन त्याचा वागवणुक अहवाल संबंधीत पोलीस उपायुक्तांना पाठवण्यात येतो व सदर अहवाल परदेशी नागरीक नोंदणी कार्यालयात सादर करण्यात येतो. आमचे कार्यालय लगेच संबंधीत देशांच्या दुतावासाला कळवतात त्या नंतर सदर नागरिकाकडून अधिक काळ रहीवास परत पाठवणीचे शुल्क वसुल केले जाते व त्या नंतर त्याची त्याच्या देशात रवानगी होते असे सींग यांनी सांगितले.

ज्योती प्रीया सींग यांनी जीथे जीथे काम केले तेथे त्यांची ओळख लेडी सिंघम म्हणून झाली, त्यांच्या कामाचा आवाका पाहुन गुंडांची तर पळताभुई झाली, त्यांची कारकिर्द नेहमी प्रशंसनीय राहीली. सामान्य माणुस त्यांच्याकडे त्याच्यावर झालेल्या अन्यायाची कुठलीही तक्रार घेउन गेला की त्या तक्रारदाराला नक्कीच न्याय मीळवुन देतात व त्यामुळे त्यांची लेडी सिंघम म्हणुन ओळख निर्माण झाली.
बांग्लादेशातील एक नागरिक ज्याची दहा वर्षापुर्वी परत पाठवणी केली होती, त्याला मागील महीन्यात घरफोडी च्या प्रकरणामध्ये पुणे पोलीसांनी अटक केली आहे, या आरोपीकडे तपास केल्यानंतर बऱ्याच गोष्‍टींची उकल झाली, त्यात प्रामुख्याने गुन्हेगारी प्रवृती असलेले नागरिक त्यांच्या देशात जाउन नवीन नावाने नोंदणी करुन पार पत्र मीळवतात व परत आपल्या देशात येउन त्यांचे गैरधंधे सुरु करतात, त्याकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बायोमेट्रीक पद्धत लागू करणे गरजेचे आहे. ही पद्धत जर जागतीक स्तरावर अमलात आली तर, याचा फायदा फक्त भारताला नव्हे तर संपुर्ण जगाला होईल व अतिरेकी कारवायांना पण मोठ्या प्रमाणात आळा बसेल, त्याकरिता सुरक्षा यंत्रणा व केंद्रीय गृह खात्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ विधीज्ञ पी डी देशपांडे यांनी पुढारी प्रतिनिधीला सांगीतले.