Tue, Jan 22, 2019 00:22होमपेज › Pune › जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल 

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल 

Published On: Jun 03 2018 5:11PM | Last Updated: Jun 03 2018 5:11PMपुणे  प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी त्यांचा मुलगा जयेश जितेंद्र जगताप ( वय 28, घोरपडे पेठ) यांनी लोगमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तो शुन्य क्रमांकाने समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप यांनी शनिवारी दुपारी घोरपडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.