Thu, Apr 25, 2019 03:33होमपेज › Pune › ‘बीआरटी’मध्ये घुसखोरी करणार्‍या 47 वाहनांना दंड

‘बीआरटी’मध्ये घुसखोरी करणार्‍या 47 वाहनांना दंड

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:30AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पीएमपीच्या  बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या सुमारे 47 वाहनांवर सोमवारी पीएमपीच्या  सुरक्षा विभाग आणि वाहतूक पोलिस यांनी संयुक्त कारवाई केली. येरवडा नगर मार्गावरील  शास्त्रीनगर येथे 25 चारचाकी तर 10 दुचाकी अशी मिळून सुमारे 35 वाहने तर वाकड येथील किवले मार्गावर 8 चारचाकी आणि  4 दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या वाहनचालकांना वेळोवेळी सुचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बीआरटी मार्गवर वॉर्डनचीही नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, मनमानी करणारे वाहनचालक कोणत्याही सूचनांचे पालन करीत नसल्याच दिसून आले त्यामुळे अखेर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली. पीमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड  म्हणाले,“बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची घुसखोरी करू नये  यासाठी जनजागृती करणारे पत्रके लावण्याचे काम सुरू आहे.