Sun, Apr 21, 2019 05:53होमपेज › Pune › मद्यविक्रीच्या महसुलात  आठ टक्क्यांनी वाढ

मद्यविक्रीच्या महसुलात  आठ टक्क्यांनी वाढ

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 1:47AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे विभागातील जवळपास दीड हजार दुकानांना मद्यविक्रीस बंदी असतानाही या वर्षात मद्यविक्रीच्या महसुलामध्ये आठ टक्क्यांंनी वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मोहन वर्दे यांनी दिली.   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील 500 मीटरच्या आतील मद्यबंदी 1 एप्रिल पासून लागू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने सर्वच प्रकारच्या मद्य विक्रीमध्ये घट झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील वाढ सर्वाधिक आहे. एप्रिल 2016 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीमध्ये 849 कोटी 47 लाखांचा महसूल मिळाला होता. तर, यावर्षी तो 922 कोटींच्या वर गेला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 72 कोटी 55 लाखांची वाढ असल्याचे दिसत आहे. ही वाढ जवळपास साडेआठ टक्क्यांची आहे. पुणे विभागाने एकूण उद्दिष्टपूर्तीच्या 97.95 टक्के उद्दिष्ट प्राप्त केले आहे. यामध्ये देशी-विदेशी मद्यासह बियरच्या महसुलाचा समावेश आहे. सर्वात कमी महसूल ऑगस्टमध्ये (87 कोटी 66 लाख) मिळाला. तर, सर्वाधिक महसूल नोव्हेंबरमध्ये (149 कोटी) मिळाला आहे.