Sun, Jul 21, 2019 15:04
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › तीन वषर्रांत साडेचोवीस कोटींचे अवैध मद्य पकडले

तीन वषर्रांत साडेचोवीस कोटींचे अवैध मद्य पकडले

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 1:50AM

बुकमार्क करा

पुणेे : प्रतिनिधी

शहरात अवैध मद्यविक्री करणार्‍यांचा सुळसुळाट झाला असून गेल्या तीन वर्षांत उत्पादन शुल्क विभागाने साडेचोवीस कोटी रुपयांचे मद्य तसेच इतर साहित्य पकडले आहे. विभागाने आठ हजार कारवाया करत अवैध मद्यविक्री करणार्‍या साडेचार जणांना पकडले आहे.

जिल्हा आणि शहरात अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्कचे 14 पथके कार्यरत आहेत. विभागाने 2015-16 मध्ये 3 हजार 334 ठिकाणी कारवाया करत 1 हजार 748 जणांना पकडण्यात आले आहे. तर, त्यांच्याकडून 358 वाहने जप्त करण्यात आली असून 9 कोटी 57 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2016-17 मध्ये 3 हजार 330 कारवाया केल्या असून 1 हजार 842 आरोपींना पकडण्यात आले. 312 वाहनांसह 9 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत 2160 कारवाया केल्या आहेत. यामध्ये 1 हजार 245 आरोपींना पकडण्यात आले असून पाच कोटी 52 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात हातभट्टी आणि अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जात होती. गेल्या तीन वर्षात 4 हजार 635 जणांना अवैध मद्यविक्री प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. तर, जिल्हा आणि शहरात 8 हजार 824 कारवाया केल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध मद्यविक्री रोखण्यात यश मिळविले आहे.