Tue, Jul 16, 2019 01:57होमपेज › Pune › पुणेः आयटी अभियंत्यांचा बुडून मृत्यू

पुणेः आयटी अभियंत्यांचा बुडून मृत्यू

Published On: May 12 2018 1:36PM | Last Updated: May 12 2018 5:23PMपिंपरी : प्रतिनिधी 

वाकड येथील एका खासगी जलतरण तलवामध्ये पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार (दि.११) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. गट्टूबल्ली भार्गव (२४, रा हिंजवडी, मूळ आंध्रप्रदेश) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

गट्टूबल्ली भार्गव हा हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत आयटी अभियंता म्हणून नोकरीस होता. गट्टूबल्ली याने एक महिन्याचा पोहायला शिकण्याचा क्लास लावला होता.  गेल्या ८ मेला त्याचा हा क्लास पूर्ण झाला. त्या काळात तो पोहायला शिकला होता. यानंतर तो सरावासाठी जलतरण तलावात एकटाच सराव करीत होता. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो जलतरण तलावात उतरला आणि अचानक पाण्यात बुडाला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

 

आयटी अभियंत्याच्या मृत्यूप्रकरणी वाकडच्या सिल्व्हर स्पोर्ट्स क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वाकड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गट्टूबल्ली पोहत असताना त्याला लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते. तसेच यावेळी ठिकाणी लाईफ गार्ड देखील उपस्थित नव्हते. सिल्व्हर स्पोर्ट्स क्लबच्या हलगर्जीपणामुळेच गट्टूबल्ली यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी या मागणीची गंभीर दखल घेत व्यवस्थापना विरोधात गुन्हा नोंद केला.