Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Pune › हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

उच्चभ्रू  समजल्या जाणार्‍या डेक्कन भागातील  पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या ठिकाणावरून उझबेकिस्तान देशातील महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात राजेश व सूरज बुना नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवून गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. पब, हुक्का तसेच लॉटरी आणि जुगार अड्ड्यांप्रमाणे सध्या शहरात वेश्या व्यवसायही तेजीत सुरू आहे. स्पाच्या नावावर हा व्यवसाय करण्यात येत असून, त्यात परदेशातील मुलींचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून या ठिकाणांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांना माहिती मिळाली की, डेक्कन येथील आपटे रस्त्यावर असणार्‍या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलींकडून वेश्या व्यावसाय करून घेतला जात आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, कर्मचारी नितीन तेलंगे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी उझबेकिस्तान देशातील  महिलेची सुटका करण्यात आली. तसेच 9 हजार रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. महिलेला महंमदवाडी येथील रेस्न्यू फाउंडेशन येथे पाठविण्यात आले आहे.