Thu, Jan 17, 2019 04:53होमपेज › Pune › धावत्या कारला आग;जीवित हानी नाही(Video)

धावत्या कारला आग;जीवित हानी नाही(Video)

Published On: Jul 29 2018 4:44PM | Last Updated: Jul 29 2018 5:09PMपुणे : प्रतिनिधी

धावत्या कारला भीषण आग लागल्याची घटना पुण्यातील रामटेकडी भागात घडली. सुदैवाने वेळीच चालक आणि एकजण कारमधून बाहेर आल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली. रविवारी दुपारी ही घटना घडली.

प्रकाश कान्होबा जाधव (वय 25) यांची ही कार होती. ते रविवारी दुपारी त्यांच्या मारुती ईस्टीम कारमधून दुपारी बीआरटी मार्गावरील रामटेकडी एसआरपीएफ गेट समोरून निघाले होते. त्यावेळी अचानक कारमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी कार थांबवली व बाहेर पडले. काही क्षणातच कारणे पेट घेतला. नागरिकांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. हडपसर अग्निशामक दलाने घटनास्‍थळी दाखल होत कारची आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किटमुले आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.