Fri, Apr 19, 2019 12:18होमपेज › Pune › स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई

स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न, मोबाईलचा वापर, तोतयागिरीचा प्रयत्न किंवा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणार्‍या उमेदवारांवर आयोगामार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना दोन ते पाच वषार्र्ंसाठी परीक्षेला बंदी तर, काही विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आल्याचे आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षेत अनेकवेळा गैरप्रकार होताना दिसून येतात.

यामध्ये अनेक उमेदवार हे दोषी आढळतात. त्यांच्यावर आयोगाकडून 2011 पासून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर कारवाईचे स्वरूप निश्‍चित केले जाते.  इतके दिवस ही कारवाई आयोगाच्या पातळीवर करण्यात येत होती. पंरतु स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी आणि परीक्षेत वाढत असलेल्या गैरप्रकारांच्या धर्तीवर आयोगाने संकेतस्थळावरच  सुमारे 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 2011 पासून 2018 पर्यंत आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकारांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संकेतस्थळाच्या होमपेजवर ‘काळ्या यादीतील उमेदवार’ या शीर्षकाखाली जाहीर करण्यात आली असल्याचेदेखील आयोगाने कळविले आहे.
 

 

 

tags : pune,news,examination,competition, malpractices, Action,


  •