Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Pune › नदीसुधार योजनेसाठी स्वतंत्र कंपनी

नदीसुधार योजनेसाठी स्वतंत्र कंपनी

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:48AMपुणे :प्रतिनिधी 

पुणे शहरात असणार्‍या मुळा मुठा नद्यांच्या विकासाच्या राबवण्यात येणार्‍या नदीसुधार योजनेसाठी विशेष स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात यावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. सुमारे दोन वर्षांपासून या योजनेचा निधी पडून होता. त्यावर कोणतीही कार्यवाही न होता नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत होती. अखेर कंपनी तयार करण्याच्या प्रस्तावामुळे मेट्रो आणि स्मार्ट सिटी पाठोपाठ नदीसुधार योजनेवरही महापालिकेचे नियंत्रण राहणार नसल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे.  मात्र योजनेच्या कामाला सुरुवात होऊ शकते. 

नदीसुधार योजनेच्या माध्यमातून सुमारे 44 किलोमीटर लांबीच्या मुळा-मुठा नदीच्या किनार्‍यावर विविध विकासकामे करणे आणि पाण्याची स्वच्छता करणे यासह विविध कामे होणार आहेत. शिवाय शहरात तयार होणार्‍या सातेसातशे एमएलडी मैलापाण्यापैकी केवळ तीनशे एनएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल आहे. उर्वरित प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे काही मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने जपान इंटरनॅशनल कार्पोरेशनचे मदतीने योजनेचे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही योजना सक्षम अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र कंपनीचा ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर येत्या मंगळवारी (दि 6)रोजी निर्णय होणे अपेक्षित आहे.