Tue, Mar 26, 2019 12:12होमपेज › Pune › ‘डेल्टा डिस्टीलरिज’च्या आणखी दोन गोदामांवर छापा

‘डेल्टा डिस्टीलरिज’च्या आणखी दोन गोदामांवर छापा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

यूएसएल कंपनीच्या बाटल्यांमध्ये आपल्या कंपनीचे मद्य भरून त्या विक्रीसाठी पाठविणार्‍या हडपसर इंडस्ट्रीमधील डेल्टा डिस्टीलरिजच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली होती. अटक केलेल्यांकडे  पोलिसांनी कोठडीदरम्यान केलेल्या तपासाच्या माहितीच्या आधारावर इतर दोन गोदामांवर छापा टाकून आणखी 16 लाख 27 हजार रुपये किमतीच्या आणखी 15 हजार 221 बॉटल गुन्हे शाखेच्या युनिट पाचने राज्य उत्पादन शुक्‍ल विभागाच्या अधिकार्‍यांसह छापा टाकून जप्त केल्या आहेत. 

डेल्टा डिस्टीलरिजचे मॅनेजर ललित विश्वनाथ खाडिलकर (वय 51, रा़  शनिवार पेठ), सुपरवायझर रवींद्र रामकृष्ण तायडे (वय 46, रा़  गंगानगर, फुरसुंगी) आणि अकाऊंटंट सुनील रघुनाथ इंगळे (वय 42, रा़  शिवाई गार्डन, सुरक्षानगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़  त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्यासह डेल्टा डिस्टीलरिज या कंपनीचे मालक प्रसाद बळीराम हिरे (रा़  मुंबई) आणि फायनान्सियल कंट्रोलर लक्ष्मण कन्हैयालाल तिडवाणी (रा़  कोल्हापूर) यांच्याविरुद्ध  हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. 

शुक्रवारी (दि. 23)  गुन्हे शाखेच्या युनिट पाचने राज्य उत्पादन शुक्‍ल विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने डेल्टा डिस्टीलरिज प्रा. लि. कंपनीवर छापा टाकला होता. त्यावेळी मद्य भरलेल्या बाटल्यांसह एकूण 1 लाख 29 हजार 750 बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. तिघांकडे पोलिस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत आणखी दोन गोदामांबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रायका लिकर एलएलपी सर्वे नं 164, 4 ए/5 या सोमनाथ वेअर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह या फुरसुंगी येथील गोदामावर छापा टाकून मद्याच्या 6 हजार 548 बाटल्या जप्त केल्या.

त्यानंतर मे. मेहरब एन. इराणी अ‍ॅण्ड कंपनी या कोंढवा येथील गोदामातून 8 हजार 973 बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही गोदामातून एकूण  16 लाख 27 हजार 560 रुपये किमतीच्या  15 हजार 521 बाटल्या मद्यांसह जप्त करण्यात आल्या आहेत. यातील मे. मेहरब एन. इराणी या गोदामाचे मालक लक्ष्मण कन्हैयालाल तिडवाणी हे असल्याचे समोर आले आहे. 
 


  •