होमपेज › Pune › 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड 

101 किलो चक्क्याची शंकराची पिंड 

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली आहे. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही ‘चक्केश्वरा’ची पूजा पाहण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. माधव जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा यंदाच्या वर्षी विशेष आकर्षण ठरला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे  सह  कर्मचारी उपस्थित होते. मंदिरातील व्यवस्थापक विजय पाचंगे, उमेश धर्माधिकारी, वैभव निलाखे, नंदकुमार चिप्पा, शोभा गाडेकर, विनायक झोडगे, लक्ष्मीबाई पत्की, युवराज पवार, ॠषिकेश अभंग, कल्लाप्पा घेरडे यांनी ही चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास तीन तासात साकारली. पुरुषोत्तम वैद्य गुरुजी  यांनी पौरोहित्य केले. 

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले,महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी 101 किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. यामध्ये बदाम, द्राक्षे, केळी, कवठ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणार्‍या भाविकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.