Fri, Feb 22, 2019 17:43होमपेज › Pune › डीएसकेंच्या जामिनावर  13 मार्च रोजी सुनावणी

डीएसकेंच्या जामिनावर  13 मार्च रोजी सुनावणी

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 1:01AMपुणे  :  प्रतिनिधी 

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सध्या येरवडा कारागृहात असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) (वय 68, रा. सेनापती बापट रस्ता) यांच्या जामीनावर सरकारी पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने, याप्रकरणी 13 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती (वय 59) या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर डीएसकेंनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी पक्षाने जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 13 मार्च रोजी होणार आहे. 

 ठाणे येथील प्रॉपर्टीच्या एका प्रकरणात डीएसकेंना 6 कोटी 55 लाख रुपये मिळणार आहेत. गुंतवणूकदारांचे देणे देण्यासाठी ही रक्कम ताब्यात मिळावी, असा अर्जही डीएसकेंचे वकील चिन्मय इनामदार आणि अप्रमेय शिवदे यांनी न्यायालयात केला आहे. मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी नीलेश मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.