Sun, Feb 24, 2019 04:28होमपेज › Pune › सायकल योजनेसाठी  66 कोटींची निविदा

सायकल योजनेसाठी  66 कोटींची निविदा

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 1:51AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

    शहरातील बहुचर्चित एकात्मिक सायकल योजनेच्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर अवघ्या नऊच दिवसांत योजनेच्या कामांसाठी  66 कोटी 82 लाखांची निविदा काढली आहे. यातून सायकल ट्रॅक, वॉक वे विकसित करण्यात येणार आहे. निविदा काढण्यास घाई केल्याने याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.  सायकल योजनेच्या आराखड्यास मान्यता देण्यासाठी 14 डिसेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या खास सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनीही गोंधळ घातला. त्यामुळे खास सभेत चर्चा न करताचा या निविदेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या नउ दिवसांच्या कामकाजाच्या दिवसानंतर म्हणजे 30 डिसेंबर रोजी तब्बल 66 कोटी 82 लाख रुपयांची निविदा काढली आहे.

या निविदेच्या सेट हा तब्बल 193 पानी, तर दुसरा 86 पानी आहे. यासाठीचे सेक्शन मॉडेलही तयार झाले आहेत. त्यामुळे या कामासाठी अधिकारी प्रत्यक्ष जागेवर गेले कधी? अभ्यास केला कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या 3 वर्षांची सरासरी वार्षिक 33.41 कोटीची उलाढाल असलेला ठेकेदार असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. दोन एक्सकेव्हेटर, दोन बेकहोलोडर, दहा डंपर, आर.एम.सी. प्लांट आदीही अटी टाकल्या आहेत. 18 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता सायकल आराखड्याचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादरीकरण करण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले होते. त्याआधीच सायकलीची निविदा काढली आहे. त्यामुळे या कामाची निविदा काढण्यासाठी एवढी घाई का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.