Thu, Mar 21, 2019 16:16होमपेज › Pune › जिग्नेश मेवानी, उमर खालीदविरोधात तक्रार

जिग्नेश मेवानी, उमर खालीदविरोधात तक्रार

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:46AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या (दि. 31) एल्गार परिषदेत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांनी भावना भडकावणारे वक्तव्य केल्याने राज्यात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार मंगळवारी (दि. 2) डेक्कन पोलिसांकडे करण्यात आली.  अक्षय गौतमराव बिक्कड (22) आणि आनंद गणेशराव धोंड (25) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्यावर 153 अ आणि 505 या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. एल्गार परिषद विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. त्यामुळे हा तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे डेक्कन पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले.