Mon, Apr 22, 2019 16:42होमपेज › Pune › कर्मचार्‍यानेच कंपनीचा डाटा चोरला

कर्मचार्‍यानेच कंपनीचा डाटा चोरला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे ; प्रतिनिधी

कर्मचार्‍याने आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे तसेच कंपनीची गोपनीय माहिती चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.  ही माहिती चोरून त्याद्वारे विविध संकेत स्थळावर कंपनीच्या नावाने इमेलवरून बदनामीकारक मजकूर टाकून कंपनीची विश्‍वासार्हता कमी केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साहिल जयप्रकाश सुरवसे (वय 33, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कामेश विरेश गौड (रा. नोयडा दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा भागातील विदुषी इन्फोटेक एस. एस. पी. प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरीस आहेत. तर, आरोपी कामेश त्यांच्याकडे घरून काम करण्याच्या पद्धतीने (वर्क फॉर्म होम) कामाला होता. कंपनी वेगवेगळ्या पदार्थ, वस्तू यांची जाहिरात व कॉल सेंटरच्या माध्यमाचे काम करते.  त्यादरम्यान त्यांने कंपनीच्या कराराचे उल्लंघन केले. कंपनी तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे कामासंबंधीचे सर्व गोपनीय माहिती हार्डडिस्क व पेन ड्राईव्हमध्ये घेतली.

त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या माहिती असणारा स्काईप आयडी व पासवर्ड घेऊन त्याद्वारे कंपनीच्या इमेलवरून स्वतःच्या इमेलवर घेतले. त्यानंतर जस्ट डायल, सुलेखा डॉट कॉम, ब्लॉगस्पॉट आणि इतर या कंपनीच्या संकेतस्थळावर फिर्यादी यांच्या कंपनीचा बनावट इमेल आयडी तयारकरून बदनामीकारक मजूर टाकला.  तसेच, ही माहिती इतर ग्राहकांना पाठवून कंपनीची विश्‍वासर्हता घालवली. त्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीसोबत काही ग्राहकांनी करार रद्द केले, आहेत अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मुकूंद महाजन यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास महाजन करत आहेत.
 


  •