Wed, Mar 27, 2019 04:32होमपेज › Pune › पुरंदर विद्यापीठास अखेर टाळे

पुरंदर विद्यापीठास अखेर टाळे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : गणेश खळदकर 

उच्च शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार अखेर ‘पुरंदर’ विद्यापीठ बंद करत असल्याचे पत्र, दादा जगताप याने उच्च शिक्षण संचालनालयास पाठवले आहे. त्यामुळे दैनिक ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश आले असून, अखेर या विद्यापीठास टाळे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. चक्‍क विद्यापीठच बोगस पध्दतीने काढून, नियमबाह्य पदव्यांची खैरात करणारे पुरंदर विद्यापीठ बोगस असल्याचे दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणून सतत पाठपुरावा केला. त्यानंतर राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाकडून हे विद्यापीठ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

यासंदर्भात उच्च तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर अखेर सूत्रे हलली आणि या विद्यापीठावर, विद्यापीठ कायदा 2013च्या कलम 5 प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्यांनी या विद्यापीठाचा तथाकथित प्राचार्य दादा जगताप याला विद्यापीठ बोगस असून, तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार हे विद्यापीठ बंद करत असल्याची माहिती दादा जगताप याने उच्च शिक्षण संचालनालयास पत्राव्दारे कळविली आहे. 
 

 

 

 

tags ; pune,news,Closing the University of 'Purandar'


  •