Sun, Jun 16, 2019 11:59
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › नागरी सुविधांची माहिती देण्यास महापालिका प्रशासन उदासीन

नागरी सुविधांची माहिती देण्यास महापालिका प्रशासन उदासीन

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:29AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाकडे वेगवेगळी प्रमाणपत्रे आणि दाखले दिले जातात. यासंबंधीची माहिती नागरिकांना पालिकेतर्फे दिली जाते. महापालिकेच्या नियमानुसार नागरि सुविधाची माहिती दर तीन महिन्याने प्रसिद्ध करणे गरजेचे असताना, मात्र मागील काही महिन्यांपासून नागरि सुविधांची माहिती अपडेट करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरि सुविधांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यास पालिका प्रशासन उदाशीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र, संपत्ती कर भरणे, संपत्ती हस्तांतर, विभाग नकाशे, झोन दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, नळ जोडणी, अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे महापालिकेतर्फे नागरिकांना दिली जातात. यासंबंधीची माहिती नागरिकांना होण्यासाठी माहिती फलक आणि संकेतस्थळावर प्रकाशित करणे महापालिका नियम 60 नुसार पालिका प्रशासनाला बंधनकारक आहे. ही माहिती दर तीन महिन्याने अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र गेली अनेक महिन्यापासून ही माहिती अपडेट केली जात नाही. संबंधीत माहिती अपडेट करण्याच्या सूचना वारंवार करण्यात आल्या आहे. मात्र त्याकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केले आहे. आत्ता पुन्हा एकदा माहिती अपडेट करण्याचा आद्यादेश वरीष्ठांनी काढला असून यावर कार्यवाही न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे दिल्या जाणार्‍या सेवा, कालमर्यादा, पदसिध्द अधिकारी, अपीलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी आदी माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.