Fri, Jul 10, 2020 21:13



होमपेज › Pune › स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच

स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 2:08AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांसाठी वितरण करण्यात येणार्‍या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. त्यानंतर आता अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर छापे टाकून अपहाराचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे शहरात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तीनही या दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यांच्याकइून तब्बल 69 लाख 51 हजार 520 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, अनियमितपणे धान्य वितरण करणार्‍या अजून काही दुकानांवर लवकरच धाडी टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शहरामध्ये अन्नधान्य वितरणची 11 परिमंडळीय कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रांवर शासनाच्या आदेशानुसार ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे शिधा पत्रिकाधारकांच्या अंगठ्याचा ठसा (थंब इम्प्रेशन) घेऊन स्वस्त धान्य वितरित केले जाते. मात्र, स्वस्त धान्य वितरकांनीही अपहाराचा मार्ग शोधला आहे. ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर धाडी टाकून त्यांच्या अपहाराचा पर्दाफाश केला आहे. या दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यांच्याकइून तब्बल 69 लाख 51 हजार 520 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंढवा आणि पिंपरीतही धान्य काळाबाजाराचा होत असल्याचा प्रकार समोर आला होता.  धान्याचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच ‘ई-पॉस’ मशिन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य घोटाळा समोर आला आहे. अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी तीन दुकानदारांकडून 69 लाख 51 हजार 520 रुपयांचा दंड वसूल केला जाणार असल्याची  माहिती अधिकार्‍यांनी दिली.