Mon, Nov 19, 2018 14:45होमपेज › Pune › कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण : १ लाख १० हजारांची रिकव्हरी

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण : १ लाख १० हजारांची रिकव्हरी

Published On: Aug 21 2018 6:35PM | Last Updated: Aug 21 2018 6:35PMपुणे प्रतिनिधी

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने  बँकेच्या माहितीचे विश्लेषन करून बँकेच्या दोन ग्राहकांकडून १ लाख १० हजार रूपयांची रिकव्हरी केली आहे. हे  दोघे बँकेचे नियमित ग्राहक आहेत. त़्यातील एकाकडून ९० हजार तर एकाकडून २० हजार रुपये रिकव्हर करण्यात आले आहेत.

बँकेच़्या सर्व्हरवर हल्ला झाला तेव्हा अनेक नियमीत ग्राहकांच़्या खात्यात प्रत्यक्षात असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिसल्याने त़्यांनी मोठ्या रकमा अशा प्रकारे काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात आणखी रिकव्हरी होऊ शकते असे सुत्रांनी सांगितले आहे.