Tue, May 21, 2019 18:23होमपेज › Pune › बुलेटप्रुफ जॅकेटस्बाबत सरकार गंभीर नाहीच

बुलेटप्रुफ जॅकेटस्बाबत सरकार गंभीर नाहीच

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:35AMपुणे : देवेंद्र जैन

सन 2008 मधील 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये निकृष्ट बुलेटप्रुफ जँकेट्सअभावी अनेक पोलिस अधिकार्‍यांना आपला जीव गमवावा लागला होता. असे असतानाही राज्य सरकार याविषयी  गंभीर नसल्याचे आढळून आले आहे. कारण महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेल्या पाच हजार पैकी दीड हजार बुलेटप्रुफ जॅके ट चाचणीमध्ये बाद ठरली आहेत. त्यामुळे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी ती संबंधित पुरवठादाराकडे परत पाठवून मोठा दणका दिला आहे. 

महाराष्ट्र सरकारने 8 वर्षानंतर 17 कोटी रुपये खर्च करून 5000 हजार बुलेट प्रुफ जँकेट खरेदी केली. त्यापैकी 4 हजार 600 जँकेट पोलिसांना मिळाली. परंतु, अतिरिक्त पोलिस महासंचालक लक्ष्मीनारायन यांनी मिळालेले 4 हजार 600 जँकेट चाचणीसाठी चंदीगड येथील न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवली. प्रयोगशाळेने घेतलेल्या चाचणीत एके 47 रायफलमधून झाडलेल्या गोळ्या झेलण्याची ताकत 1 हजार 430 जँकेटमध्ये नसल्यामुळे ही जँकेट चाचणीमध्ये बाद ठरली.  त्यामुळे लक्ष्मीनारायन यांनी सदर 1 हजार 430 जँकेट परत पाठवली आहेत.

26/11 च्या दहशतवादी हल्याची नोंद संपूर्ण जगाने घेतली होती. या हल्याला नुकतेच 9 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ठ दर्जाच्या बुलेटप्रुफजँकेटमुळे मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी व  दशहतवाद विरोधी पथकाचे राज्याचे प्रमुख हेमंत करकरे यांना जीव गमवावा लागला होता. सर्वच खात्यात फोफावलेल्या भ्रष्ट कारभारामुळे व गृह खात्यावर योग्य नियंत्रण नसल्यामुळे पुरवठादारांनी 4 हजार 600 जँकेट महाराष्ट्र पोलिसांना पाठवली; पण कर्तव्यदक्ष असलेल्या लक्ष्मीनारायन यांनी या सर्वच जँकेट ची चाचणी घेतली. यापूर्वी पुरवठादारांनी अशीच  निकृष्ठ जँकेट पुरवल्यामुळे व  जँकेटच्या चाचण्या न झाल्यामुळे राज्याने अनेक पोलिस गमावून मोठी किंमत मोजली आहेे. 

या हल्ल्याचा संपूर्ण अहवाल जेव्हा सरकारसमोर आला. त्यावेळी पोलिसांकडे नसलेल्या अत्याधुनिक शस्त्रांबरोबरच बुलेट प्रुफ जँकेटची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली. त्याचवेळी पोलिसांना कमांडोंसारखी शस्त्रे, अत्याधुनिक उपकरणे व बुलेट प्रुफ जँकेट देण्याची मागणी करण्यात आली होती.