Thu, Apr 18, 2019 16:28होमपेज › Pune › पुणे रेल्वे स्थानकावर आज ब्लॉक लोकलसह अनेक गाड्या रद्द 

पुणे रेल्वे स्थानकावर आज ब्लॉक लोकलसह अनेक गाड्या रद्द 

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे रेल्वे स्थानकावर रविवार (दि. 25) देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3 व 4 वर 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येणार असून त्याच्या गर्डरचे काम हाती घेण्यात आले आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 दरम्यान तब्बल 6 तासांचा ब्लॉक असणार असून यामुळे लोकलसह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.  पुण्याहून सकाळी 5.45 वाजता सुटणारी 99806 पुणे-लोणावळा लोकल, लोणावळ्याहून सकाळी 7.25 वाजता सुटणारी 99805 लोणावळा-पुणे लोकल, पुण्याहून सकाळी 10.32 वाजता सुटणारी 71407 पुणे-दौंड डेमू, पुण्याहून सकाळी 11.15 वाजता

सुटणारी 51318 पुणे-कर्जत पॅसेंजर, पुण्याहून दुपारी 12.15 वाजता सुटणारी 99816 पुणे-लोणावळा लोकल, लोणावळा येथून दुपारी 2.50 सुटणारी लोणावळा-पुणे लोकल, कर्जत येथून दुपारी 3.10 वाजता सुटणारी कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.  त्याचबरोबर बारामती-पुणे पॅसेंजर दौंडपर्यंतच धावणार असून दौंड ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर पुणे-निजामाबाद पॅसेंजर पुणे ते दौंड दरम्यान रद्द करण्यात आली असून ही गाडी दौंड येथून सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.